बारामतीत उपनगराध्य व स्वीकृतपदी कोणाची लागणार वर्णी सर्वांचे लक्ष
काही ज्येष्ठ कार्यकर्ते व नेत्यांनी स्वीकृत नगरसेवकपद स्वीकारण्यास नकार दिल्यान! बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच चर्चेत

बारामतीत उपनगराध्य व स्वीकृतपदी कोणाची लागणार वर्णी सर्वांचे लक्ष
काही ज्येष्ठ कार्यकर्ते व नेत्यांनी स्वीकृत नगरसेवकपद स्वीकारण्यास नकार दिल्यान! बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच चर्चेत
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेत शुक्रवारी 16 रोजी होणाऱ्या स्वीकृत नगरसेवक,गटनेते तसेच उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. जसे उद्योगजगत या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे, तसेच कार्यकर्ते व विद्यमान नगरसेवकांमध्येही या निवडीबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
विशेषतः स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत पारंपरिक व ज्येष्ठ नगरसेवकांना डावलले जाणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्यातच काही ज्येष्ठ कार्यकर्ते व नेत्यांनी स्वीकृत नगरसेवकपद स्वीकारण्यास नकार दिल्यान! बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच चर्चेत आले आहे.
आता ही संधी नेमकी कोणाला मिळणार,पुढील पाच वर्षांत चार स्वीकृत नगरसेवक नेमले जाणार की प्रत्येकी एक वर्ष याप्रमाणे पाच वर्षात वीस जणांना संधी मिळणार हे पहावं लागणार आहे.तसेच निवड करताना दिलेला शब्द पाळला जाणार का,असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिले जात आहेत. यामुळे पक्षांतर्गत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांच्या अपेक्षा या निर्णयावर अवलंबून आहेत.
तसेच निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचे पुनर्वसन होणार का?






