अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (मुली) बेसबॉल स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास विजेतेपद प्राप्त
कार्यक्रमास रेश्मा पुणेकर, क्रीडा अधिकारी व श्रीशिवछ्त्रपती पुरस्कार प्राप्त या उपस्थित होत्या.

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (मुली) बेसबॉल स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास विजेतेपद प्राप्त
कार्यक्रमास रेश्मा पुणेकर, क्रीडा अधिकारी व श्रीशिवछ्त्रपती पुरस्कार प्राप्त या उपस्थित होत्या.
बारामती वार्तापत्र
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (मुली) बेसबॉल या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी देशभरातून ५२ संघाने सहभाग नोंदविला होता.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धा (मुली) स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडला. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास मुकेश सैनी, निरीक्षक बेसबॉल स्पर्धा हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले.
या कार्यक्रमास रेश्मा पुणेकर, क्रीडा अधिकारी व श्रीशिवछ्त्रपती पुरस्कार प्राप्त या उपस्थित होत्या. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धेचे विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने पटकावले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. उपप्राचार्य प्रा.डॉ.योगिनी मुळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना प्राचार्य डॉ.अविनाश जगताप म्हणाले की, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या मैदानावर दि. २ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत आयोजिलेल्या बेसबॉल स्पर्धांमध्ये विविध विद्यापीठाच्या मुलांचे ५२ व मुलींचे ३९ संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला व अतिशय जोशपूर्ण व उत्साही वातावरणात या स्पर्धा पार पडल्या याबद्दल समाधान व्यक्त केले. दि. २ ते ६ या कालावधीत बेसबॉल (मुले) स्पर्धांचे आयोजन केले होते. तर दि. ७ पासून १० जानेवारी या कालावधीत बेसबॉल मुलीच्या स्पर्धाचे आयोजन केले होते. प्राचार्य डॉ.अविनाश जगताप म्हणाले कि, या चॅम्पियनशिपमध्ये शिस्तबद्ध सांघिक कार्य, दृढनिश्चय आणि खिलाडू वृत्तीचे दर्शन झाले. केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर खेळाबद्दल आणि एकमेकांबद्दलचा आदरभाव व उच्च दर्जाची स्पर्धात्मक उत्कृष्टता प्रदर्शित केली. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक व क्रीडा शिक्षणाच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल मुलींच्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे (महाराष्ट्र), द्वितीय क्रमांक – महात्मा गांधी विद्यापीठ, कोट्टायम, तृतीय क्रमांक कालिकत विद्यापीठ, कालिकत, चतुर्थ क्रमांक केरळ विद्यापीठ, तिरुअनंतपूरम असे आहेत.
त्याचप्रमाणे कालिकत विद्यापीठातील आशिका प्रकाश हिस बेस्ट कॅचर, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समीक्षा भुजबळ हिस बेस्ट पिचर आणि महात्मा गांधी विद्यापीठातील किर्तना हिस बेस्ट हिटर म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पारितोषिक वाचन डॉ.गौतम जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.अशोक देवकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.संदेश राठोड यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सचिन गाडेकर, प्रा.डॉ.अरुण मगर, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, सुषमा संगई, श्री.इंद्रजित नितनवार, डॉ.पद्माकर गाडेकर, डॉ.राहुल भोसले, प्रा.संतोष जानकर, डॉ.सुहास भैरट उपस्थित होते. या संपूर्ण स्पर्धांचे नियोजन व प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांचे मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.गौतम जाधव, श्री.अशोक देवकर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर व संस्थेचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.






