राजकीय

बारामती नगरपालिका : गटनेतेपदी संजय संघवी, उपगटनेतेपदी सौ संपदा चौधर, प्रभोदपदी विशाल हिंगणे यांची निवड 

संघवी यांचा प्रशासकीय अनुभव, संघटनात्मक कौशल्य

बारामती नगरपालिका : गटनेतेपदी संजय संघवी, उपगटनेतेपदी सौ संपदा चौधर, प्रभोदपदी विशाल हिंगणे यांची निवड 

संघवी यांचा प्रशासकीय अनुभव, संघटनात्मक कौशल्य

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपालिकेच्या गटनेतेपदी संजय संघवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबाबत नगरपालिकेतील संबंधित गटाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमताने संजय संघवी यांच्या नावाला मंजुरी दिली.

याच बैठकीत उपगटनेतेपदी सौ. संपदा सुमित चौधर यांची निवड करण्यात आली. तसेच प्रभोदपदी नगरसेवक विशाल भानुदास हिंगणे यांची निवड जाहीर करण्यात आली.

उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे आमदार अजित पवार यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

संजय संघवी यांच्या निवडीमुळे नगरपालिकेतील गटाचे नेतृत्व अधिक भक्कम होईल, असा विश्वास गटातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

संघवी यांचा प्रशासकीय अनुभव, संघटनात्मक कौशल्य तसेच सर्व नगरसेवकांशी असलेले समन्वयाचे संबंध लक्षात घेता त्यांच्या नेतृत्वाखाली गट अधिक प्रभावीपणे काम करेल आणि आगामी काळात बारामती शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button