राजकीय

बारामती नगर परिषद स्वीकृत सदस्यपदी ‘या’ नावांची वर्णी लागण्याची शक्यता

अधिकृत घोषणा होईपर्यंत या नियुक्त्यांबाबत निश्चित काही सांगता येणार नाही

बारामती नगर परिषद स्वीकृत सदस्यपदी ‘या’ नावांची वर्णी लागण्याची शक्यता

अधिकृत घोषणा होईपर्यंत या नियुक्त्यांबाबत निश्चित काही सांगता येणार नाही

बारामती वार्तापत्र 

बारामती नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यपदासाठी लवकरच नियुक्त्या होण्याची शक्यता असून या पदांसाठी सोमनाथ गाजाकस, अमोल कावळे, राहुल वाघोलीकर आणि गणेश जोजारे यांच्या नावांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. नगर परिषद प्रशासन आणि राजकीय वर्तुळात या संभाव्य नियुक्त्यांमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.या निवडीमध्ये ज्येष्ठांना डावलले असल्यामुळे पुढील नगरपरिषदेचा कारभार कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यांची नियुक्ती ही त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय अनुभवाच्या आधारे करण्यात येते. या पार्श्वभूमीवर वरील चारही व्यक्तींनी विविध क्षेत्रांत केलेले कार्य लक्षात घेता त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सोमनाथ गाजाकस यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला असून स्थानिक प्रश्नांबाबत त्यांची ठाम भूमिका ओळखली जाते. अमोल कावळे हे युवकांमध्ये लोकप्रिय असून संघटनात्मक कामाचा त्यांना चांगला अनुभव आहे. राहुल वाघोलीकर यांनी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिले असून गणेश जोजारे हे प्रशासकीय समन्वय व सामाजिक कार्यासाठी परिचित आहेत.

या संभाव्य नियुक्त्यांमुळे नगर परिषदेमध्ये अनुभवी व विविध क्षेत्रांतील प्रतिनिधित्व वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत या नियुक्त्यांबाबत निश्चित काही सांगता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button