स्थानिक

ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशनच्या मकर संक्रांती महाशॉपिंग व फूड फेस्टिवलला विक्रमी प्रतिसाद

यशस्वी नियोजनामुळे स्टॉलधारकांमध्ये समाधानाचे वातावरण

ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशनच्या मकर संक्रांती महाशॉपिंग व फूड फेस्टिवलला विक्रमी प्रतिसाद

यशस्वी नियोजनामुळे स्टॉलधारकांमध्ये समाधानाचे वातावरण

बारामती वार्तापत्र 

ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशनच्या वतीने मकर संक्रांतीच्या पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मकर संक्रांती महाशॉपिंग व फूड फेस्टिवल 2026 ला बारामतीकरांचा उस्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद लाभला. दि. 9, 10 व 11 जानेवारी 2026 दरम्यान राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, बारामती येथे पार पडलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाने सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित केले.

या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन बारामतीचे नगराध्यक्ष मा. सचिनजी सातव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जोतिचंद भाईचंद सराफ & सन्स प्रा. लि. चे चेअरमन मा. शितलजी शाह यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी बारामती शहरातील सर्व 22 नवनिर्वाचित नगरसेविकांचा सन्मान करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष सामाजिक व राजकीय महत्त्व प्राप्त झाले.

प्रदर्शनाच्या कालावधीत अनेक नगरसेवक, मान्यवर, उद्योजक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देत स्टॉल्सची पाहणी केली. सर्वांनी आयोजनाच्या शिस्तबद्ध नियोजनाचे आणि दूरदृष्टीपूर्ण व्यवस्थापनाचे मुक्तकंठाने कौतुक केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी स्टॉलधारकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत कु. सृष्टी दिवेकर हिने प्रथम क्रमांक पटकावून आकर्षक पैठणीची मानकरी ठरली. ही पैठणी छाजेड गारमेंट्स यांच्या सौजन्याने देण्यात आली.

तिसऱ्या दिवशी जोतिचंद भाईचंद ग्रुप अकॅडमी ऑफ डिझाईन यांच्या वतीने आयोजित भव्य फॅशन शोने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. तसेच प्रेक्षकांसाठी आयोजित लकी ड्रॉमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक जोतिचंद भाईचंद सराफ & सन्स प्रा. लि. होते. सहप्रायोजक म्हणून स्वराज फर्निचर, अमृता चहा, छाजेड गारमेंट्स, बालाजी सारीज, द हॅपी टेल्स फोटो स्टुडिओ, S.S. बुटीक व चंद्रकला अँटिक ज्वेलरी यांनी सहकार्य केले. जावेद हबीब पार्लर & सलून आणि जोतिचंद भाईचंद ग्रुप अकॅडमी ऑफ डिझाईन हे ॲडव्हर्टायझिंग पार्टनर, तर योद्धा प्रोडक्शन हे मिडिया पार्टनर होते.

या प्रदर्शनात बारामतीसह पुणे, कराड, सांगली, सातारा, वाई आदी ठिकाणांहून आलेल्या उद्योजकांनी आकर्षक शॉपिंग स्टॉल्स, संक्रांतीसाठी खास साहित्य तसेच चविष्ट फूड स्टॉल्स सादर केले. तीन दिवसांत विक्रमी गर्दी आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

यशस्वी नियोजनामुळे स्टॉलधारकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी या प्रदर्शनाला पाच-तारांकित रेटिंग देत आयोजकांचे कौतुक केले.

या यशस्वी उपक्रमाबद्दल ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीता पोटे, सचिव दर्शना जैन, सल्लागार अश्विनीकुमार पत्की व संपूर्ण कोअर टीमने सर्व बारामतीकर, मान्यवर, प्रायोजक व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Back to top button