उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश आणि बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षांचा राजीनामा
बारामती सहकारी बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य पदी ओंकार देवळे यांची निवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश आणि बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षांचा राजीनामा
बारामती सहकारी बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य पदी ओंकार देवळे यांची निवड
बारामती वार्तापत्र
दि बारामती सहकारी बँकेच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन सदाशिव सातव यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. या बैठकीदरम्यान श्री. सातव यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बँकेच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल संचालक मंडळाने त्यांचे आभार मानले व पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच बँकेच्या व्यवस्थापन मंडळामध्ये रिक्त झालेल्या जागेवर श्री. ओंकार किशोर देवळे यांची व्यवस्थापन मंडळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
दि बारामती सहकारी बँकेच्या आजअखेर ठेवी प्रमाण रू. २२४७ कोटी, कर्जवाटप रू. १३८२ कोटी व गुंतवणूक रू. १००९ कोटी तर बँकेचा निव्वळ एन.पी.ए. १.४६% व भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) १६.१९% अशी बँकेने प्रगती केलेली आहे. बँकेच्या पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक व रायगड या सहा जिल्हयांत ३६ शाखा व १ विस्तारित कक्ष कार्यरत आहे.
या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन सातव, उपाध्यक्षा सौ. नुपूर शहा (वडूजकर), तज्ञ संचालक श्री. प्रितम पहाडे (सी.ए.), अॅड. श्री. शिरीष कुलकर्णी अध्यक्ष व्यवस्थापन मंडळ तसेच संचालक श्री. रोहित घनवट, श्री. किशोर मेहता, श्री. विजयराव गालिंदे, श्री. देवेंद्र शिर्के, श्री. उध्दव गावडे, श्री. नामदेवराव तुपे, श्री. जयंत किकले, श्री. रणजित धुमाळ, श्री. मंदार सिकची, डॉ. श्री. सौरभ मुथा, संचालिका डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे, तसेच तज्ञ संचालक अॅड. श्री. रमेश गानबोटे तसेच कार्यकारी संचालक श्री. विनोद रावळ व मुख्यालयातील अधिकारी वर्ग उपस्थित होता.






