स्थानिक

बारामती शहर पोलीस स्टेशन पीआयंचे अवैध दारूविरोधात कडक पावले उचलण्याचे आश्वासन

अवैध दारू विक्री, जुगार, मटका व इतर बेकायदेशीर व्यवसायांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

बारामती शहर पोलीस स्टेशन पीआयंचे अवैध दारूविरोधात कडक पावले उचलण्याचे आश्वासन

अवैध दारू विक्री, जुगार, मटका व इतर बेकायदेशीर व्यवसायांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील बेकायदेशीर सुरू असलेल्या अवैध दारू भट्ट्या व इतर अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आव्हान बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी स्वीकारले आहे.

शहरात वाढत चाललेल्या अवैध व्यवसायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

दरम्यान, बारामती प्रशासकीय भवनाबाहेर सामाजिक कार्यकर्ते संजय सोपान रणदिवे यांनी अवैध धंदे बंद व्हावेत या मागणीसाठी मुदतचक्र उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाद्वारे त्यांनी शहरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, मटका व इतर बेकायदेशीर व्यवसायांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. उपोषणकर्त्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या या परिसरात भेट देणार असल्याने या उपोषणाकडे विशेष लक्ष लागले आहे. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर दबाव वाढला आहे.

या दरम्यान, बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी (पीआय) उपोषणकर्ते संजय सोपान रणदिवे यांची भेट घेऊन, अवैध दारू भट्ट्या व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कायदेशीर चौकटीत कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

पीआय यांनी दिलेले हे आश्वासन सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आता प्रशासन व पोलीस यंत्रणा प्रत्यक्षात कोणती ठोस पावले उचलतात,याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

Back to top button