बारामतीत जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
किमान वेतन,पी.एफ,इ.एस.आय.सी.कामगार कायद्याप्रमाणे त्यांच्या खात्यावर जमा केले जात नाही.

बारामतीत जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
किमान वेतन,पी.एफ,इ.एस.आय.सी.कामगार कायद्याप्रमाणे त्यांच्या खात्यावर जमा केले जात नाही.
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेने दिलेल्या कंत्राटी मनुष्यबळ पुरवठ्यासाठी दिलेल्या ठेक्याची शासकीय कर्मचाऱ्यांची समिती नेमून चौकशी करण्यात यावी.सदर ठेक्यातील कंत्राटी कामगार यांना किमान वेतन,पी.एफ,इ.एस.आय.सी.कामगार कायद्याप्रमाणे त्यांच्या खात्यावर जमा केले जात नाही.
सदर समितीमार्फत चौकशी ठेकेदाराला ठेका दिल्यापासून आजपर्यंत कामगारांना नियमाप्रमाणे वेतन,पी.एफ.,पी.एफ,इ.एस.आय.सी.दिले आहे का याची चौकशी करण्यात यावी.
सदर चौकशी होऊन कारवाई होईपर्यंत बारामती नगरपरिषद ठेकेदाराला देय असलेली देयक/ (रनिंग बिल), सुरक्षा अनामत रक्कम देण्यात येऊ नये.तसेच कामगारांचा किमान वेतन व इतर देण्यांमधील फरक देण्यात यावा.अशा मागण्यांचे निवेदन जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे वतीने बारामती नगर परिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना देण्यात आले.
यावेळी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,बारामती शहराध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विजय मस्के, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे,सरचिटणीस सुरज वाडेकर , सहसंघटक ओम शिंदे इतर पदाधिकारी उपस्थित होते.






