क्रीडा

पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ सायकल स्पर्धा टप्पा क्रमांक तीन; वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

२१ जानेवारी २०२६ रोजी रात्री १० ते २० जानेवारी २०२६ रोजी ८ वाजेपर्यंत

पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ सायकल स्पर्धा टप्पा क्रमांक तीन; वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

२१ जानेवारी २०२६ रोजी रात्री १० ते २० जानेवारी २०२६ रोजी ८ वाजेपर्यंत

पुणे;प्रतिनिधि

पुणे जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने “पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ अंतर्गत २२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित टप्पा क्रमांक तीनच्यावेळी सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यासोबत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहे.

या स्पर्धेचा टप्पा क्रमांक तीनअंतर्गत सासवड, जेजुरी, वडगाव निंबाळकर, सुपा, माळेगाव, बारामती तालुका व बारामती शहर स्टेशनहद्दीत एकूण १३७ कि.मी अंतर असून स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचेआदेश जारी केले आहेत, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:

सासवड पोलीस स्टेशन हद्दीत: हडपसर सासवड जेजुरी रोडवरील वाहतूक चंदनटेकडीपासून सासवडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन सर्व वाहतूक बायपासने बोरावके मळा अशी बाह्यवळण मार्गाने वळविण्यात येणार आहे.
सासवड कापूरहोळ मार्गावरील सासवडकडून कापूरहोळकडे जाणारी वाहतूक पानवडी गाव पास होईपर्यंत पुर्णपणे बंद करुन ही सर्व वाहतुक चंदनटेकडी बायपास बोरावके मळा-वरीफाटा-परिंचे-वीर-मार्ग कापूरहोळ अशी वळविण्यात येत आहे.

सासवड शहर पास करुन कोंढवाकडे जाणारी सर्व वाहतूक बोरावके मळा बायपास चंदनटेकडी दिवेघाट मार्गे तसेच सासवड वीर मार्गावरील वाहतूक चंदनटेकडी बायपास बोरावकेमळा वरीफाटा मार्गे वळविण्यात येत आहे.

कापूरहोळकडून सासवडकडे येणारी वाहतूक ही कापूरहोळ फाट्यावरुन कात्रज घाटमार्गे वळविण्यात येत आहे. तसेच खेड शिवापूरमार्गे मरिआई घाटमार्गे सासवडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे. गोगलवाडी मार्गे चतुर्मुख घाट आणि पठारवाडी घाटमार्गे भिवरी किंवा बारवडी मार्गे सासवडकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे.

यवत बाजूकडून भुलेश्वर घाटमार्गे सासवड कापूरहोळकडे जाणारी वाहतूक भुलेश्वर फाटा येथून हडपसर मंतरवाडी फाटामार्गे कात्रज बँगलोर महामार्गाकडे वळविण्यात येत आहे. शिंदवणे घाटमार्गे सासवड कापूरहोळकडे जाणारी वाहतुक उरुळीकांचन तळवडी चौक येथून हडपसर मंतरवाडी फाटामार्गे कात्रज बँगलोर महामार्गाकडे वळविण्यात येत आहे. वीर उमाजी नाईक चौक येथे वाठार कॉलनी मार्गे येणारी वाहतूक हद्दीतून सारोळाकडे वळविण्यात येणार आहे.

राजगड पोलीस ठाणे हद्दीतून न्हावी भोंगवली मार्गे परिंचे धनकवडी रोडकडे येणारी वाहतूक तसेच राजगड पोलीस ठाणे हद्दीतून किकवी पाचलिगे मार्गे बांदलवाडी काळदरीकडे येणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.

सासवड पोलीस स्टेशन हद्दीत नगरपरिषद परिसर येथे २१ जानेवारी २०१६ रोजी रात्री १० ते २० जानेवारी २०२६ रोजी ८ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना येण्यास मनाई करण्यात येत आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत: सातारामार्गे अहिल्यानगर, केडगाव चौफुलाकडे जाणारी सर्व वाहतूक लोणंद-फलटण-बारामती-भिगवण-केडगाव चौफुला मार्गे अहिल्यानगर या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
सासवडमार्गे बारामती व सातारा जाणारी सर्व वाहतुक बेलसर फाटा-बेलसर गाव-नाझरे, कप-पांडेश्वर-आंबी-सुपा-उंडवडी-बारामती-फलटण-सातारा या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
फलटण, लोणंद येथून जेजुरी मार्गे पुणे येथे जाणारी सर्व वाहतूक फलटण-लोणंद-शिरवळ या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टशेन हद्दीत: बारामती-निरा ते सातारा जाणारी वाहतूक बारामती येथूनच फलटणमार्गे वळविण्यात येत आहे. तसेच बारामतीचे पुढील स्थानिक वाहतूक जी निरामार्गे लोणंद, सातारा जाते ती करंजेपुल चौक येथून वाणेवाडी-मुरुम,फलटण-काळज-लोणंद अशी वळविण्यात येणार आहे. बारामती ते निरा-लोणंद-सातारा जाणारी वाहतूक बारामती येथून फलटणमार्गे वळविण्यात येत आहे. बारामती ते करंजेपूल वाणेवाडी मुरुम ते काळज पुढे लोणंद मार्गे सातारा तसेच सातारा ते लोणंद निरा बारामती जाणारी वाहतूक लोणंद येथून फलटणमार्गे वळविण्यात येत आहे.

सायकल स्पर्धेदरम्यान पुढील मार्ग बंद राहील: वडगाव निबांळकर पो. स्टेशन अंतर्गत निरा कॉर्नर, बारामती कॉर्नर, चौधरवाडी फाटा, वाकी फाटा, मोढवे, जोगवडी फाटा मुर्टी, मोराळवाडी फाटा, मुर्टी, पळशी, लोणीभापकर फाटा, मुर्टी तसेच जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुळूंचे गावातील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.

सुपा पोलीस स्टेशन हद्दीत: शिरुर-सातारा हायवे मार्गावरील वाहतुक केडगाव चौफुला-पाटस-खराडेवाडी-उंडवडी सुपे-बारामती-फलटण-सातारा याप्रमाणे वळविण्यात येणार आहे.
सासवड-मोरगाव बारामती मार्गावरील वाहतूक सासवड-कुंभार-वळण-पारगाव-पिसवे-राजुरी-नायगाव-रिसे पिसे-सुपा-उंडवडी सुपे-बारामती तसेच सासवडवरुन जेजुरी मार्गे बारामतीकडे जाणारी वाहतूक सासवड-बेलसर फाटा-बेलसर-पारगाव-पिसर्वे-सुपा-उंडवडी सुपे-बारामती अशी वळविण्यात येत आहे.

बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत: इंदापूर बारामती रोडने बारामतीकडे येणारी वाहतूक काटेवाडी ब्रीज येथे बंद करुन ती वाहतूक काटेवाडी कमानीतून उजव्या बाजूने काटेवाडी गावातून कन्हेरी गावमार्गे जळोची ब्रीजवरुन बारामतीकडे वळविण्यात येणार आहे.
सोनगाव बाजूकडून येणारी वाहतूक काटेवाडी ब्रीजखालून कन्हेरीमार्गे जळोची ब्रीजवरुन बारामतीकडे वळविण्यासोबतच पालखी महामार्गावरुन होणारी सर्व वाहतूक स्पर्धा सुरु झाल्यापासून ते समाप्त होईपर्यंत बंद करण्यात येणार आहे. इंदापूर रोडने बारामतीकडे येणारी अवजड वाहतूक वालचंदनगर हद्दीत बंद करण्यात येत आहे.

भिगवण बारामतीरोडने भिगवणबाजुकडून बारामती (पेन्सिल चौक) कडे येणारी वाहतुक स्व. गोपिनाथ मुंढे चौक येथे बंद करुन संत तुकाराम महाराज पालखी मार्गाने कटफळ चौक-आरटीओ ऑफिस चौक-पेन्सिल चौक मार्गे बारामतीकडे वळविण्यात येणार आहे. भिगवण बाजूकडून एमआयडीसी बारामतीकडे येणारी अवजड वाहतूक भिगवण येथे बंद करण्यात येणार आहे.

बारामती भिगवण रोडने बारामती बाजूकडून भिगवण बाजुकडे येणारी सर्व वाहतूक पेन्सिल चौकातून आरटीओ ऑफिसमार्गे एमआयडीसी रोडने पुढे कटफळ चौकातून संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाने स्व. गोपिनाथ मुंडे चौकातून भिगवण बाजूकडे वळविण्यात येत आहे. बारामती एमआयडीसीमध्ये बारामती भिगवण रोडने होणारी वाहतूक पेन्सिल चौकातून आरटीओऑफिसमार्गे वळविण्यात येत आहे. बारामती एमआयडीसीमध्ये भिगवण बारामतीरोडने होणारी सर्व वाहतूक स्व. गोपिनाथ मुंढे चौकातून कटफळ चौकमार्गे वळविण्यात येत असून ही सर्व वाहतूक स्पर्धा सुरु झाल्यापासून शेवट होईपर्यंत वळविण्यात येणार आहे.

रुई गावातून बारामतीकडे येणारी व बारामतीकडून रुई गावाकडे जाणारी सर्व वाहतूक रुई महादेव मंदिरापासून निर्मिती विहार मार्गे आढयातून बनकर वडेवाले अभिमन्यु कॉर्नर येथून गदीमा रोडने पेन्सिल चौक या ठिकाणी वळविण्यात येणार आहे. पाटस बाजुकडून वारामती एमआयडीसी या ठिकाणी येणारी सर्व जड वाहतूक यवत पोलीस स्टेशन हद्दीत पाटस येथे बंद करण्यात येत आहे.

पुढील वाहतूक बंद राहील: पालखी महामार्गावरील काटेवाडी चौक, पालखी महामार्गावरील जळोची ब्रिज येथून पालखी महामर्गावर येणारी सर्व वाहतूक. पालखी महामार्गावरील कुरणवस्ती सावळ याठिकाणी असलेल्या चौकातून पालखी महामार्गावर येणारी वाहतूक, पालखी महामार्गावरील रुई ब्रिज येथून पालखी महामार्गावर येणारी वाहतूक, पालखी महामार्गावरील वंजारवाडी ब्रिज येथून पालखी महामार्गावर येणारी वाहतुक. भिगवण बारामती रोडवरील स्व. गोपिनाथ मुंढे चौक वंजारवाडी येथे, बारामती एमआयडीसीमधून डायनामिक्स चौक याठिकाणी भिगवण बारामती भिगवण रोडवर येणारी वाहतूक, बारामती भिगवण रोडवर पेन्सिल चौक एमआयडीसी बारामती याठिकाणी, बारामती भिगवण रोडवरुन रुई बाजुकडे जाणारी वाहतूक, संदीप कॉर्नर येथून अभिमन्यु कॉर्नर रोडची येणारी-जाणारी सर्व वाहतुक बंद करण्यात येत आहे.

बारामती तालुका पोलीस स्टेशन हहीत: विद्या प्रतिष्ठान प्रशाला परिसर येथे २१ जानेवारी रोजी रात्री १० ते २२ जानेवारी २०१६ रोजी रात्री ८ वा. पर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना येण्यास मनाई करण्यात येत आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशन हहीत: पुणे-मोरगावकडून बारामतीकडे येणारी वाहतूक मोरगाव-सुपा-कारखेल-बऱ्हाणपुरमार्गे तसेच बारामती-पुणे बाजुस जाणारी वाहतूक बारामती पाटस रोडमार्गे वळविण्यात येत आहे.

फलटणकडून-बारामतीकडे येणारी वाहतूक ही पाहुणेवाडी माळेगावकडे तसेच फलटण कडून भिगवण इंदापूर कडे जाणारी वाहतूक सांगवी, गोखळी, सोनगावमार्गे इंदापूर भिगवण रोडकडे, बारामतीकडून फलटणकडे जाणारी वाहतूक एमआयडीसी कन्हेरी सोनगावमार्गे फलटणकडे तसेच इंदापूरकडून-बारामतीकडे येणारी वाहतूक कन्हेरी सावळमार्गे भिगवण रोडकडे वळविण्यात येत आहे.

बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक तांदुळवाडी रोडमार्गे एमआयडीसी रोडने भिगवण, भिगवणकडून बारामतीकडे येणारी वाहतूक वंजारवाडी पालखी मार्गे पुलापासून एम.आय.डी सी मार्गे, बारामतीकडुन भिगवणकडे जाणारी वाहतूक तांदुळवाडी रोडमार्गे एमआयडीसी रोडने वंजारवाडी पालखी मार्गे पुलापासून भिगवण रोडकडे, गुणवडी बीकेबीएन रोड गुणवडीकडून बारामतीकडे जाणारी वाहतुक सोनगाव पासून काटेवाडीकडे तसेच बारामतीकडुन बीकेबीएन गुणवडी रोडकडे जाणारी वाहतुक तांदुळवाडी रोडने एमआयडीसी रोडने वंजारवाडी पालखी मार्गे पुलापासून भिगवन रोडकडे आणि निरा रोडकडून बारामतीकडे येणारी वाहतूक माळेगाव मार्गे सांगवी, मेखळी, सोनगावकडे वळविण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button