बारामती बाजार समितीमध्ये मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू
२२० शेतक-यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे.

बारामती बाजार समितीमध्ये मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू
२२० शेतक-यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार आवारात मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले आहे. बाजार आवारात लिलावा मध्ये मकेचे दर हमीभावा पेक्षा कमी निघत असल्याने आणि शेतकरी संघटनेचे मागणी वरून समितीने हमीभाव केंद्र सुरू करणेची शासनाकडे मागणी केली होती.
केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत हंगाम २०२५-२६ मध्ये मका खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू आहे. ज्या मका उत्पादक शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही अशा शेतक-यांनी दि. २८/२/२०२६ पर्यन्त नाव नोंदणी करून खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती तर्फे करणेत येत आहे.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांना एसमएस द्वारे मका घेऊन येणेची तारीख कळविणेत येणार आहे. त्याच दिवशी शेतक-यांनी खरेदी केंद्रावर आपली मका आणावी. मकेचा हमीदर रू. २४००/- असुन प्रति एकर ९.५० क्विंटल मका घेणेत येणार आहे. शासनाने दिलेल्या अटीनुसार आवश्यक कागदपत्रे जमा करून नाव नोंदणी करावयाची आहे.
सदरचे केंद्र जळोची उपबाजार येथील भाजी मार्केट आवारातील गोदाम मध्ये सुरू असल्याची माहिती सचिव श्री.अरविंद जगताप यांनी दिली.
बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघात ऑनलाईन नोंदणी सुरू असुन आत्ता पर्यन्त २२० शेतक-यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे. शासनाचे दिलेल्या निकषा प्रमाणे मका खरेदी करणेत येणार आहे.
त्यामुळे शेतक-यांनी मका वाळलेली व स्वच्छ करूनच खरेदी केंद्रावर आणावी असे आवाहन निरा कॅनॉल संघाचे चेअरमन सतिश काकडे यांनी केले आहे.
यावेळी बारामतीचे पुरवठा अधिकारी तितिक्षा बारापात्रे, निरीक्षक कचरे साहेब, मार्केटींग फेडरेशनचे प्रमोद लोखंडे, बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघाचे मॅनेजर सुरेश काकडे, अमोल कदम, शशांक जगताप, प्रशांत मदने आणि बाजार समितीचे विभाग प्रमुख सुर्यकांत मोरे उपस्थितीत होते.






