आभासीवारी अंतर्गत इंदापूर महाविद्यालयात वृक्षारोपण.
उपक्रमांतर्गत ११३० रोपांची लागवड करण्यात आली.
आभासीवारी अंतर्गत इंदापूर महाविद्यालयात वृक्षारोपण.
उपक्रमांतर्गत ११३० रोपांची लागवड करण्यात आली.
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आभासीवारी अंतर्गत इंदापूर महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
कोरोनाच्या संकटामुळे पंढरीची वारी थांबली आहे. यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने आभासी वारी सुरू केली असून यामध्ये स्वयंसेवकांनी आपापल्या घरी थांबूनच घराच्या परिसरामध्ये फळझाडांची लागवड करावयाची होती. प्रत्येक स्वयंसेवकांनी एक झाड लावून SPPU NSS वारीमध्ये सहभाग नोंदवावयाचा आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,उपाध्यक्षा पद्माताई भोसले,सचिव मुकुंद शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर महाविद्यालयांमध्ये आभासी वारीचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे सचिव मुकुंद शहा व प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
महाविद्यालय मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ मधील सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला.एकुण ११३० रोपांची लागवड या उपक्रमांतर्गत झाली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. गौतम यादव,विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. तानाजी कसबे व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.