बारामती नगरपरिषदेत स्थायी व विषय समित्यांची निवड होणार २३ जानेवारी रोजी विशेष सभा; सभापतींची निवडणूक होणार
स्थायी समितीची रचना झाल्यानंतर आगामी काळातील नगरपरिषदेचे प्रशासन व विकासाचे निर्णय अधिक गतीने होण्याची अपेक्षा आहे.

बारामती नगरपरिषदेत स्थायी व विषय समित्यांची निवड होणार
२३ जानेवारी रोजी विशेष सभा; सभापतींची निवडणूक होणार
स्थायी समितीची रचना झाल्यानंतर आगामी काळातील नगरपरिषदेचे प्रशासन व विकासाचे निर्णय अधिक गतीने होण्याची अपेक्षा आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेमधील स्थायी समिती तसेच विविध विषय समित्यांची निवड करण्यासाठी शुक्रवार,दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.ही माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासन शाखेमार्फत देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या ४ नोव्हेंबर व २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.त्यानुसार बारामती नगरपरिषदेचे अध्यक्ष व सदस्य निवडून आले असून, त्यांची नावे २३ डिसेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
कायदेशीर तरतुदीनुसार समित्यांची स्थापना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ६३, ६४, ६५ व ६६ तसेच विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणूक नियम, २००६ नुसार नगरपरिषदेमध्ये स्थायी समिती व विषय समित्या गठीत करणे बंधनकारक आहे.
त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी, पुणे यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून बारामती नगरपरिषदेची विशेष सभा बोलावली आहे.
विशेष सभेतील महत्त्वाचे विषय
या विशेष सभेत पुढील निर्णय घेतले जाणार आहेत
नगरपरिषदेत किती विषय समित्या असतील हे निश्चित करणे प्रत्येक विषय समितीतील सदस्यसंख्या ठरविणे उपाध्यक्ष कोणत्या विषय समितीचे पदसिद्ध सभापती असतील हे ठरविणे विषय समित्यांवरील सदस्यांचे नामनिर्देशन (उपाध्यक्षांच्या समितीखेरीज) इतर विषय समित्यांच्या सभापतींची निवड
अखेरीस स्थायी समितीची रचना करून ती जाहीर करणे पिठासीन अधिकारी नियुक्त
या विशेष सभेसाठी श्री. पंकज भुसे, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नामनिर्देशन व निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
स्थायी समितीची अंतिम घोषणा राजकीय हालचालींना वेग या विशेष सभेमुळे बारामती नगरपरिषदेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध पक्ष व गटांकडून विषय समित्या व सभापती पदांवर वर्चस्व मिळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
स्थायी समितीची रचना झाल्यानंतर आगामी काळातील नगरपरिषदेचे प्रशासन व विकासाचे निर्णय अधिक गतीने होण्याची अपेक्षा आहे.






