माळेगाव–पणदरे गटात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादीतील नाराज गट भाजपच्या वाटेवर
सुमारे ३०० ते ४०० युवक राष्ट्रवादीला रामराम ठोकून अन्य पक्षात,

माळेगाव–पणदरे गटात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादीतील नाराज गट भाजपच्या वाटेवर
सुमारे ३०० ते ४०० युवक राष्ट्रवादीला रामराम ठोकून अन्य पक्षात,
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील माळेगाव–पणदरे गटात सध्या राजकीय वातावरण तापले असून येत्या काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बहुचर्चित माळेगाव–पणदरे गटातून जर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून बहुचर्चित उमेदवाराचे नाव अधिकृतरीत्या जाहीर झाले, तर राष्ट्रवादीतील एक मोठा गट थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार,माळेगाव–पणदरे गटातून एखाद्या युवा नेत्याला उमेदवारी दिल्यास इच्छुक व नाराज कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.या नाराजीचा परिणाम म्हणून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. विशेष म्हणजे, येत्या काही दिवसांत भाजपचे वरिष्ठ पातळीवरील नेते दौंड तालुक्यातील एका खाजगी कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती असून, याच कार्यक्रमात माळेगाव व पणदरे गटातील अनेक युवक भाजपमध्ये जाहीर प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या नाराजीमागील प्रमुख कारण म्हणजे माळेगाव साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तावरे या आडनावाला नापसंती दर्शवण्यात आली होती.असे असतानाही पुन्हा माळेगाव–पणदरे गटातून त्यांचीच पुनर्वती (पुन्हा उमेदवारी) होणार असल्याची चर्चा सुरू होती.मात्र, आता जगताप तावरे या नावाला डावलून इतर कोणत्या तरी व्यक्तीला उमेदवारी देण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.
या संभाव्य निर्णयामुळे तावरे जगताप समर्थक व नाराज कार्यकर्त्यांचा मोठा गट अस्वस्थ झाला असून, सुमारे ३०० ते ४०० युवक राष्ट्रवादीला रामराम ठोकून अन्य पक्षात,विशेषतः भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यामुळे येणाऱ्या काळात माळेगाव–पणदरे गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच,उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान उभे ठाकले असून,भाजप या परिस्थितीचा राजकीय फायदा उचलण्याच्या तयारीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.






