नवनिर्वाचित नगरसेविका दर्शना तांबे यांचा मकरसंक्रांतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
“प्रभागातील नागरिकांशी, विशेषतः महिलांशी सातत्याने संपर्क

नवनिर्वाचित नगरसेविका दर्शना तांबे यांचा मकरसंक्रांतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
“प्रभागातील नागरिकांशी, विशेषतः महिलांशी सातत्याने संपर्क
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका दर्शना तांबे यांच्या वतीने मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गुणवडी रोड, विश्वास नगर परिसरातील दत्त मंदिर प्रभागामध्ये महिलांसाठी खास अल्पोपहार व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.
नगरसेविका म्हणून नुकतीच प्रथमच निवड झाल्यानंतर दर्शना तांबे यांनी आयोजित केलेला हा सार्वजनिक कार्यक्रम असल्याने परिसरात याची विशेष चर्चा होताना दिसून आली. पारंपरिक सणाचे औचित्य साधून महिलांसाठी वेगळा आणि आपुलकीचा कार्यक्रम घेण्याचा त्यांचा हा उपक्रम महिलांना विशेष भावला.
कार्यक्रमादरम्यान हळदी-कुंकू, अल्पोपहार तसेच आपुलकीच्या संवादातून महिलांशी थेट संपर्क साधण्यात आला. यावेळी बोलताना नगरसेविका दर्शना तांबे यांनी सांगितले की, “प्रभागातील नागरिकांशी, विशेषतः महिलांशी सातत्याने संपर्क ठेवणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर मार्ग काढणे हे माझे प्राधान्य असेल. अशा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी नाते अधिक दृढ करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
या कार्यक्रमाला प्रभागातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नव्या नगरसेविकेकडून अशाच सामाजिक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांचेही सहकार्य लाभले.
एकूणच मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सामाजिक एकोपा आणि लोकप्रतिनिधी-नागरिक यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरला.






