आपला जिल्हा
वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे बारामती उप प्रादेशिक परिवहन आवाहन
१३ वाहने येत्या ७ दिवसात सोडवून घ्यावीत

वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे बारामती उप प्रादेशिक परिवहन आवाहन
१३ वाहने येत्या ७ दिवसात सोडवून घ्यावीत
बारामती वार्तापत्र
बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत अटकावून ठेवलेली १३ वाहने येत्या ७ दिवसात सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकांवर तसेच तसेच परिवहन विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर लावण्यात आली आहे. विहीत मुदतीत वाहनांचा ताबा न घेतल्यास या वाहनांच्या जाहीर लिलाव धातू भंगार व व्यापार महामंडळ मार्फत www.mstcecommerce.com या संकेतस्थळावर २८ जानेवारी रोजी करण्यात येईल. अधिक माहितीकरिता कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही उप प्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.






