राजकीय

भाजप नेते अभिजीत देवकाते यांची केली पक्षाने हकालपट्टी जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केले पत्र

पक्षाच्या शिस्तभंग समितीने नियमांनुसार निर्णय

भाजप नेते अभिजीत देवकाते यांची केली पक्षाने हकालपट्टी जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केले पत्र

पक्षाच्या शिस्तभंग समितीने नियमांनुसार निर्णय

बारामती वार्तापत्र 

भारतीय जनता पार्टी (भाजप) यांनी श्री. अभिजीत अरविंद देवकाते यांच्यावर गंभीर स्वरूपाची शिस्तभंग कारवाई केली आहे. कारण त्यांनी पक्षाच्या अधिकृत धोरणांना आणि पक्षशिस्तीला थेट विरोध करणारी भूमिका घेतली आहे.

भाजपकडून अभिजित देवकाते यांच्यावर जिल्हा परिषद गट व गण निवडणुकांसाठी पक्षाचे उमेदवार उभे करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. म्हणजेच, पक्षाचे अधिकृत उमेदवार निवडणे व त्यांना पाठिंबा देणे ही त्यांची जबाबदारी होती.

मात्र, असे असताना त्यांनी आपल्या पत्नी शिवानी अभिजीत देवकाते यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करून त्यांना उघड पाठिंबा दिला.हे कृत्य भाजपच्या दृष्टीने पक्षनिष्ठेचा स्पष्ट भंग मानले जाते, कारण एका पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत करत असल्याचे यातून दिसून येते.

यामुळे पक्षाच्या शिस्तभंग समितीने नियमांनुसार निर्णय घेत अभिजीत अरविंद देवकाते यांना भारतीय जनता पार्टीतून कायमची हकालपट्टी करण्याचा आदेश दिला आहे.

Back to top button