स्थानिक

वसंत  पंचमी व अक्षराभ्यास : अनेकान्त स्कूलमध्ये चिमुकल्यांच्या ज्ञानप्रवासाचा पावन प्रारंभ

पिवळा रंग विकास, ऊर्जा, आनंद

वसंत  पंचमी व अक्षराभ्यास : अनेकान्त स्कूलमध्ये चिमुकल्यांच्या ज्ञानप्रवासाचा पावन प्रारंभ

पिवळा रंग विकास, ऊर्जा, आनंद

बारामती वार्तापत्र 

दि. २३ जानेवारी रोजी अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूल,बारामती येथे बसंत पंचमी हा अत्यंत शुभ व पावन दिवस भक्तिभाव,उत्साह आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी नव्याने प्रवेश घेतलेल्या नर्सरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा अक्षराभ्यास विधी पारंपरिक पद्धतीने मोठ्या मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात मा. सौ. संगीता मिलिंद शहा (वाघोलीकर)
यांच्या शुभहस्ते विद्या, कला व संगीताची अधिष्ठात्री देवी माता
सरस्वती यांच्या पूजनाने झाली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता,ज्ञानप्राप्ती व सद्बुद्धीसाठी देवीकडे प्रार्थना करण्यात आली.

यानंतर पारंपरिक व भावनिक वातावरणात चिमुकल्या विद्यार्थ्यांचा अक्षराभ्यास विधी पार पडला. विद्यार्थ्यांनी पाटीवर आपले पहिले अक्षर गिरवताच त्यांच्या औपचारिक शिक्षणप्रवासाची मंगल सुरुवात झाली.

हा क्षण उपस्थित पालकांसाठी अत्यंत भावूक व स्मरणीय ठरला.
या कार्यक्रमात पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आपल्या
पाल्यांसोबत विधींमध्ये सहभागी होत त्यांनी घर व शाळा यांच्यातील सहकार्याची सकारात्मक सुरुवात केली.

बसंत ऋतूचे प्रतीक असलेल्या पिवळ्या रंगांनी शाळा परिसर उजळून निघाला. पिवळा रंग विकास, ऊर्जा, आनंद आणि नव्या ज्ञानाच्या उमलण्याचे प्रतीक असल्याने संपूर्ण वातावरण प्रसन्न झाले होते.

चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासातील या पहिल्या पावलांचे
साक्षीदार होण्याचा अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूलला अभिमान असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.

माता सरस्वती सर्व विद्यार्थ्यांना सदैव ज्ञान, यश व सद्बुद्धी प्रदान
करो, अशा मंगलकामनांसह कार्यक्रमाची सांगता झाली

Back to top button