बारामतीमध्ये कोरोनाचे नवे पाच रुग्ण.
एकाच दिवशी पाच नवे रुग्ण वाढल्याने बारामतीकरांमध्ये चिंतेचे वातावरण.
बारामतीमध्ये कोरोनाचे नवे पाच रुग्ण.
एकाच दिवशी पाच नवे रुग्ण वाढल्याने बारामतीकरांमध्ये चिंतेचे वातावरण.
बारामती:- प्रतिनिधी
आज दि.४ जुलै रोजी बारामती मध्ये एकूण ५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
बारामती शहरातील अशोकनगरमधील एक वयोवृद्ध महिला,शहरातील ज्येष्ठ नगरसेवकांचा मुलगा व तांबेनगरमधील एक रहिवासी आज कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहेत. तसेच कोरोनाग्रस्त असलेल्या आयटी अभियंत्याचा तालुक्यातील काटेवाडी येथील एक मित्रही आज पॉझिटीव्ह निघाला आहे. तर सावळ येथील पुणे शाखेत असणारा बँक कर्मचारी पॉझिटीव्ह निघाला आहे.
बारामती तालुक्यात एकूण पाच जण आज कोरोनाबाधित आढळले आहेत. अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली.
इंदापूर दौंड पाठोपाठ बारामती मध्ये मोठया प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनापुढे एक आव्हान उभे राहिले आहे.
चिंतेची बाब म्हणजे बारामतीतील ज्येष्ठ व अति महत्त्वाच्या असलेल्या स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याने अनेकांना कॉरनटाइन होण्याची वेळ आली आहे
लॉकडाऊननंतर अनलॉकच्या दिशेने जात असताना सोशल डिस्टन्सिंगचा उडलेला बोजवारा व कंटेन्मेंट झोनमधील प्रवास यामुळेही बारामतीतील रुग्ण वाढू लागल्याचे दिसू लागले आहे.