बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अभिजीत घाडगे…
रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, मॅराथॉन, शिवजयंती उत्सव,

बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अभिजीत घाडगे…
रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, मॅराथॉन, शिवजयंती उत्सव,
बारामती वार्तापत्र
बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अभिजीत घाडगे यांची निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक बांधिलकी, युवक संघटन आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांनी अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अभिजीत घाडगे हे BE (IT) शिक्षण घेतलेले असून, राजकारणाची आवड असली तरी ते केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता समाजकारणात अधिक सक्रिय राहिले आहेत.
प्रत्येक आंदोलन, कार्यक्रम आणि उपक्रमात ते आवर्जून सहभागी होत आले असून, युवकांना सोबत घेऊन काम करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.
त्यांनी आतापर्यंत रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, मॅराथॉन स्पर्धा, शिवजयंती उत्सव, तसेच पुरग्रस्तांसाठी मदतकार्य अशा विविध सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे. या उपक्रमांमधून समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते.
दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील कानाकोपऱ्यातील युवकांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. युवकांमध्ये एकोपा, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निष्ठा व प्रेम असणारे अभिजीत घाडगे हे युवकांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या कार्याची दखल घेत बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






