राजकीय

माळेगाव कारखान्याच्या दोन संचालकांची प्रचार शुभारंभला अनुपस्थिती अजितदादांनी दिला सभेतच इशारा

तुम्हाला पदं हवी असतात तेव्हा तुम्ही सारखं येणार आणि आता असं वागणार

माळेगाव कारखान्याच्या दोन संचालकांची प्रचार शुभारंभला अनुपस्थिती अजितदादांनी दिला सभेतच इशारा

तुम्हाला पदं हवी असतात तेव्हा तुम्ही सारखं येणार आणि आता असं वागणार

बारामती वार्तापत्र 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा आज बारामतीमध्ये शुभारंभ करण्यात आला.यावेळी सभेला माळेगावच्या दोन संचालकांनी अनुपस्थितत राहिल्याचे लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे संतापल्याचं पाहायला मिळालं.

तुम्हाला पदं हवी असतात तेव्हा तुम्ही सारखं येणार आणि आता असं वागणार. मला हे अजिबात चालणार नाही असा इशारा देत त्यांनी या दोनही संचालकांना भेटण्यासाठी निरोप पाठवला.

काही दिवसांपूर्वी पवार यांच्याकडे माळेगांव कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी काही संचालकांबाबत
तक्रार केली होती.त्यावेळीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याचा संचालकांना याबाबत सुनावले होते.माळेगांव कारखान्याचे संचालक नक्की करतात तरी काय याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.

तसेच सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे.त्यामुळं मला कुणी पदाधिकारी काही करत असतील तर फरक पडणार नाही.तुम्ही विनाकारण उघडं पडू नका असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

दरम्यान,तब्बल नऊ वर्षांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात अनेकांनी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीत राष्ट्रवादीकडून संधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते.

मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपवाद वगळता नव्या चेहऱ्यांना संधी दिली.त्यामुळं इच्छुकांच्या पदरी निराशाच आली.त्यातूनच अनेकांनी पक्षाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. हीच बाब लक्षात घेऊन अजितदादांनी जाहीर सभेतच पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

Back to top button