दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार यांचे बारामतीत महत्वाचे विधान! अजितदादांप्रमाणे आमचीही इच्छा…, 12 तारखेला निर्णय….
दोन्ही पक्षात सुसंवाद राहावा यासाठी सकारात्मक चर्चा सुरू होती

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार यांचे बारामतीत महत्वाचे विधान! अजितदादांप्रमाणे आमचीही इच्छा…, 12 तारखेला निर्णय….
दोन्ही पक्षात सुसंवाद राहावा यासाठी सकारात्मक चर्चा सुरू होती
बारामती वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या चार दिवसानंतर आता उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विराजमान होणार आहेत. आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेत्यांची निवड होणार आहे.
सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा यांना उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे. आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्या सुरु असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीतील घडामोडींवर भाष्य केले
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का? यावर शरद पवार म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणासाठी गेल्या चार महिन्यापासून दोन्हा पक्षात चर्चा सुरु होती. त्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला होता. मी या चर्चेत सहभागी नव्हतो. याबाबत येत्या 12 तारखेला विलिनीकरणाबाबत चर्चा होणार होती. अजित पवार गेले, त्यांना परत आणू शकत नाही,”
आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत खंड पडल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती असे मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केले. दोन्ही पक्षात सुसंवाद राहावा यासाठी सकारात्मक चर्चा सुरू होती असे पवारांनी स्पष्ट केले. आता याविषयीचा निर्णय दोन्ही बाजूचे नेते करतील असे ते म्हणाले.






