बारामतीतील टीसी कॉलेज मध्ये स्टार्ट बूट कॅम्प चे आयोजन
महाविद्यालयातील ९६ विद्यार्थी सहभागी झाले होते.

बारामतीतील टीसी कॉलेज मध्ये स्टार्ट बूट कॅम्प चे आयोजन
महाविद्यालयातील ९६ विद्यार्थी सहभागी झाले होते.
बारामती वार्तापत्र
स्टार्टअप बूट कॅम्प मधून विद्यार्थ्यांना विविध कल्पनांची निर्मिती, व्यवसाय आराखडा तयार करणे आणि तो यशस्वीपणे राबविणे यासाठी माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्याऐवजी उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांनी नवनवीन व्यवसायाचे स्टार्टअप सुरु करावेत अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस विभागाचे संचालक डॉ देविदास गोल्हार यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि वाधवाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे दि १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी एसपीपीयु स्टार्ट अप बूट कॅम्प – २०२६ चे आयोजन करण्यात आले होते.
डॉ गोल्हार यांच्या हस्ते गुरुवारी (दि १२) बूट कॅम्प चे उदघाटन झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ. योगिनी मुळे, वाधवाणी फाऊंडेशन चे प्रशिक्षक श्री. ऋषभ गिल महाविद्यालय समन्वयक प्रा. महेश फुले आदी मान्यवर उपस्थित होते.
या बूट कॅम्प मध्ये विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयातील ९६ विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्राचार्य डॉ अविनाश जगताप म्हणाले, विद्यापीठाने स्टार्ट अप बूट कॅम्प चे आयोजन करण्यासाठी टीसी कॉलेज ची निवड केली त्याबद्दल आम्ही विद्यापीठ प्रशासनाचे आभारी आहोत. विद्यार्थ्यांनी बिझनेस स्टार्ट अप आणि इनोव्हेशन साठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे. कॉलेज मधून आम्ही त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करू आणि पाठिंबा देऊ असेही त्यांनी सांगितले. दोन दिवसीय बूट कॅम्प मध्ये इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युरशिप, डिझाइन थिंकिंग, प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन अँड ऑपुर्चीनिटी डिस्कवरी, क्रियटिंग युअर व्हेंचर टीम, कस्टमर डिस्कवरी: आयडेंटिटी कस्टमर सेगमेंट,जॉब टू बी डन, सोल्युशन आयडिया जनरेशन आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. मेघा बडवे, प्रा अर्पिता वाघ यांनी केले तर प्रा महेश फुले यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री.जवाहर शाह (वाघोलीकर) व सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.






