क्राईम रिपोर्ट

बारामतीच्या बंटी बबलीला;पुण्यात अत्याचार, ब्लॅकमेल व खंडणी प्रकरणी ठोकल्या बेड्य 

व्हिडिओ आणि फोटो काढले.

बारामतीच्या बंटी बबलीला;पुण्यात अत्याचार, ब्लॅकमेल व खंडणी प्रकरणी ठोकल्या बेड्य 

व्हिडिओ आणि फोटो काढले.

बारामती वार्तापत्र 

उच्चभ्रू, प्रतिष्ठित व्यक्ती, उद्योजकांना आपल्या जाळ्यात खेचल्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन, ब्लॅकमेल करीत खंडणी उकळणाऱ्या एका दाम्पत्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

प्रताप रमेश जाधव (वय 45), पल्लवी प्रताप जाधव (वय 28, राहणार दोघे भिंताडेनगर, राघवनगर, आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी, एका महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पतीपासून विभक्त राहते. 2024 मध्ये फिर्यादी महिलेचा आरोपी पल्लवी आणि प्रताप यांच्यासोबत परिचय झाला होता. काही दिवसांनंतर फिर्यादी या आरोपी जाधव दाम्पत्यासोबत एकत्र राहत होत्या. फिर्यादीने त्यांच्याकडून दोन लाख रुपये दरमहा पाच टक्के व्याजाने घेतले होते. व्याज आणि मुद्दल असे मिळून फिर्यादींनी आरोपींना 3 लाख 60 हजार रुपये परत दिले. त्यानंतर देखील आरोपी त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी करत होते.

25 ऑगस्ट 2025 मध्ये, पल्लवी ही घरातून बाहेर गेली होती. त्या वेळी प्रताप याने जबरदस्तीने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. फिर्यादी त्या वेळी तक्रार देण्यासाठी पोलिसात निघाल्या असता, दोघांनी त्यांना थांबून ठेवले. परत दोघांनी फिर्यादींकडे पैशांची मागणी केली. फिर्यादींनी पैसे देण्यास नकार दिला. पल्लवी हिने प्रताप यास फिर्यादी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यास प्रेरणा दिली. प्रताप याने दुसऱ्यांदा त्याची पत्नी घरी असतानाच फिर्यादींवर लैंगिक अत्याचार केला. तसेच त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काढले.

फिर्यादी आरोपींसोबत गोव्याला गेल्या होत्या. तेथे पल्लवी हिने फिर्यादींसोबत अनैसर्गिक कृत्य केले. ऑक्टोबर 2025 मध्ये दोघा आरोपींनी फिर्यादींना बारामती येथील एका उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यास सांगितले. त्याबदल्यात फिर्यादींना बारामती येथील एक सदनिका आणि वीस ते पंचवीस लाख रुपये देण्याचे प्रलोभन दाखविले. दरम्यान, फिर्यादींच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी व्यावसायिकाविरुद्ध खोटी तक्रार देण्यास नकार दिला. त्या वेळी दोघा आरोपींनी फिर्यादींना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादींचे फोटो व्हायरल करण्याचे धमकावून उलट त्यांच्याकडेच दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. फिर्यादींनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी लैंगिक अत्याचार, सावकारी अधिनियमानुसार तत्काळ गुन्हा दाखल करून पल्लवी आणि प्रताप या दाम्पत्याला अटक केली. पल्लवी हिने उच्चभ्रू, प्रतिष्ठित व्यक्तींना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन, ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून खंडणीस्वरूपात पैसे स्वीकारल्याचे फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांच्या पथकाने केली.

मिलिंद मोहिते, पोलिस उपायुक्त, पुणेअटक आरोपी दाम्पत्याने जर अशाप्रकारे कोणाला ब्लॅकमेल करून पैसे उकळले असतील, तर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. तपासात या दोघांनी अनेकांना अशाचप्रकारे लुबाडल्याचे समोर आले आहे. दोघे आरोपी पती-पत्नी असून, त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर देखील हे दोघे एकत्र राहत होते.

Back to top button