क्राईम रिपोर्ट

जबरी चोरी केली मग पोलिसांनी आरोपी शोधूनच काढला गुन्हा दाखल करून येरवडा कारागृहात रवानगी

कोणताही गुन्हेगार कायद्याच्या चौकटीबाहेर राहू शकत नाही

जबरी चोरी केली मग पोलिसांनी आरोपी शोधूनच काढला गुन्हा दाखल करून येरवडा कारागृहात रवानगी

कोणताही गुन्हेगार कायद्याच्या चौकटीबाहेर राहू शकत नाही

बारामती वार्तापत्र

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा वेगवान, शास्त्रशुद्ध आणि परिणामकारक तपास करून बारामती शहर पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक करत कायद्याचा ठोस धाक निर्माण केला आहे.

08 फेब्रुवारी रोजी बारामती येथील शिवाजी चौक परिसरात फिर्यादीकडून मारहाण करून जबरदस्तीने रोख रक्कम काढून घेतल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्र. 63/2026, भा.न्या.सं. कलम 309(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण, स्थानिक माहिती आणि सखोल चौकशीच्या आधारे आरोपी नामे सिद्धार्थ संतोष घाडगे (वय 31 वर्षे, रा. सटवाजी नगर, इंदापूर चौक, ता. बारामती, जि. पुणे) याचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग निष्पन्न झाला. आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अंगझडती दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यातील रकमेपैकी काही रक्कम जप्त करण्यात आली.

आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यास प्रथम पोलीस कोठडी मंजूर झाली. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीस न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावण्यात आली असून त्याची रवानगी येरवडा केंद्रीय कारागृह येथे करण्यात आली आहे.

या प्रभावी कारवाईमुळे परिसरात कायद्याची जरब बसली असून गुन्हेगारी प्रवृत्तीला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, कोणताही गुन्हेगार कायद्याच्या चौकटीबाहेर राहू शकत नाही. बारामती शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असून गुन्हेगारीवर कठोर कारवाई सुरूच राहील.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड, प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वात पार पडली. तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप भंडारे तसेच स्टाफ पोलीस हवालदार सुलतान डांगे, पोलीस शिपाई विशाल चौधर, पोलीस शिपाई सागर जामदार, पोलीस शिपाई विशाल शिंदे, पुरुष शिपाई अक्षय सिताफ, पोलीस हवालदार अमोल शिंदे व पोलीस शिपाई नेवसे यांनी समन्वयाने आणि तत्परतेने ही कारवाई यशस्वी केली.

बारामती शहर पोलिसांच्या या कार्यक्षम कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा गुन्हेगारी प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Back to top button