आपला जिल्हा
जेजुरीत भंडाऱ्याची उधळण करीत परतीच्या प्रवासात असलेल्या माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी.
जेजुरीत भंडाऱ्याची उधळण करीत परतीच्या प्रवासात असलेल्या माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत…
यंदा कोरोनाच्या संकटामुळे संतांच्या पालख्या व वारकरी संप्रदायाला पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला जाणे शक्य झाले नाही…
जेजुरीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मुक्काम असतो मात्र जेजुरी करांना यावेळी माऊलींच्या पादुकायांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली नाही.
जेजुरीत भंडाऱ्याची उधळण करीत परतीच्या प्रवासात असलेल्या माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत त्याचा हा व्हिडीओ पहा.
आज पंढरपूर हुन माऊलींचा सोहळा परतीच्या प्रवासाला लाल परीने जात असताना सायंकाळी जेजुरी येथे आला असता या वेळी रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी उभे राहून या सोहळ्यावर भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण केली,
विठोबा माऊली व तुकारामांच्या जयघोषा सह येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष जेजुरीकर यांनी यावेळी केला…