आपला जिल्हास्थानिक

बारामती तालुक्यातील मेडद येथील मूर्ती गेली चोरीला

सुमारे २०० ते २५० वर्षे जुनी

बारामती तालुक्यातील मेडद येथील मूर्ती गेली चोरीला

सुमारे २०० ते २५० वर्षे जुनी

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील मेडद हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे २०० ते २५० वर्षे जुनी असलेली धावजी पाटील महाराजांची पवित्र मूर्ती अज्ञात चोरट्यांनी दुपारच्या सुमारास चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना बारामती तालुक्यातील मेडद परिसरात घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे दुपारी ते पूजारी पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता, धावजी पाटील महाराजांची मूर्ती जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमा झाले.

सदर मूर्ती काही दिवसांपूर्वीच जुन्या मंदिरातून विधिवत पूजाअर्चा करून नव्या मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली होती. मात्र, दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी मंदिरातून मूर्ती चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी ग्रामस्थांनी तत्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असल्याचे बोलले जात आहे. यावेळी बाळासाहेब चव्हाण, पाटील ,दादा सोळसकर,अर्जुन नाना यादव, नितीन पिसे,यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

धावजी पाटील महाराज यांची मूर्ती ही पाषाणाची असली तरी हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असल्याने या चोरीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू आहे.

Back to top button