स्थानिक

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून बारामतीमध्ये स्वच्छता मोहीम

अभियानात २५७ श्री सदस्यांनी सहभाग

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून बारामतीमध्ये स्वच्छता मोहीम

अभियानात २५७ श्री सदस्यांनी सहभाग

बारामती वार्तापत्र

श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था असून गेल्या 80 वर्षापासून या प्रतिष्ठानकडून श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे अखंड कार्य सुरू आहे.

समाजामध्ये असलेले अज्ञान, अंधश्रद्धा तसेच अनिष्ट रूढी परंपरा व व्यसनाधीनता याचे आपल्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम याची जाणीव करून दिली जाते तसेच त्यापासून वेगळे होण्याची शिकवण दिली जाते.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी अभियान राबविले जातात. रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी संपूर्ण देशभरात एकाच वेळी स्वच्छता अभियान आयोजित केलेले आहे.बारामती येथे प्रतिष्ठानच्या वतीने गणेश मार्केट-मंडई,शरदचंद्र उद्योग भवन, शाहु कॉप्लेक्स, इंदापुर चौक ते गुणवरी चौक रस्ता,गुणवडी चौक ते शिवाजी चौक रस्ता बारामती येथे अभियानात २५७ श्री सदस्यांनी सहभाग घेतला व ओला कचरा २ टन व सुका कचरा ८ टन असा एकूण १० टन कचरा संकलन केला.

Back to top button