स्थानिक
बारामतीतील अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या अनेकान्त कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामतीतील अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या अनेकान्त कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामती वार्तापत्र
महिलांचे सक्षमीकरण, समानता व समाजातील त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अनेकान्त एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसीचे नियामक मंडळाचे सदस्य मा.श्री. डॉ. राजेंद्र अभयकुमार दोशी (ढाकाळकर) उपस्थित होते. कॉलेज ऑफ फार्मसीचे मा. प्राचार्य डॉ. दर्शन शहा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातुन महिलांचे शिक्षण, संशोधन व आरोग्य क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले.

या निमित्ताने महाविद्यालयात विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सौ. वनिता कदम, पोलीस कॉन्स्टेबल (शक्तिपथक) यांनी “महिला सक्षमीकरणातील कायदे व सायबर गुन्हे” या विषयावर मार्गदर्शन करत महिलांच्या कायदेशीर हक्कांविषयी व सायबर सुरक्षिततेविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
डॉ. अपर्णा पवार, मानसोपचार तज्ञ यांनी “तणाव व्यवस्थापन व तणावरहित जीवन” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करून विद्यार्थिनींना मानसिक संतुलन व सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. तसेच डॉ. राजीव खरे, हृदयरोग तज्ञ यांनी “हृदय आरोग्य व वेलनेस” या विषयावर सविस्तर माहिती देत महिलांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली.
डॉ. अंजली व्होरा यांनी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या मानसिक व शारीरिक आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. जवाहर शहा वाघोलीकर व सचिव मा. श्री. मिलिंद शहा वाघोलीकर यांनी कार्यक्रमातून दिल्या गेलेल्या मार्गदर्शनाचा विद्यार्थिनींना नक्कीच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. अश्विनी तोडकरी व प्रा. सुकन्या परिचारक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्रा. सुकन्या परिचारक यांनी करुन कार्यक्रमाची सांगता केली.