युवा नेते जय पवार यांची संवेदनशीलता; अजान सुरू होताच थांबवलं भाषण, बारामतीकरांना झाली अजितदादांची आठवण
आपल्या भाषणाला तत्काळ थांबवून धार्मिक भावना जपण्याचा आदर्श दाखवला

युवा नेते जय पवार यांची संवेदनशीलता; अजान सुरू होताच थांबवलं भाषण, बारामतीकरांना झाली अजितदादांची आठवण
आपल्या भाषणाला तत्काळ थांबवून धार्मिक भावना जपण्याचा आदर्श दाखवला
बारामती वार्तापत्र
अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक रंगात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ युवा नेते जय पवार सध्या बारामती तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत. गावागावात भेटी देत स्थानिक प्रश्न जाणून घेतानाच ते नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.
आज सिद्धेश्वर निंबोडी येथे गावभेटीदरम्यान एक भावनिक आणि लक्षवेधी प्रसंग घडला. जय पवार ग्रामस्थांशी संवाद साधत असताना अचानक अजान सुरू झाली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाला तत्काळ थांबवून धार्मिक भावना जपण्याचा आदर्श दाखवला. अजान पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
जय पवार यांच्या या संवेदनशील आणि सन्मानपूर्वक कृतीमुळे उपस्थित ग्रामस्थ प्रभावित झाले. अनेकांनी या प्रसंगातून दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीची आणि सर्वधर्मसमभावाच्या भूमिकेची आठवण झाल्याची प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींनाही उजाळा दिला. गावभेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना ते भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यांतून अजितदादांबद्दलची आत्मीयता आणि आदर स्पष्ट दिसत होता.
दरम्यान, जय पवार यांचा हा दौरा केवळ प्रचारापुरता मर्यादित नसून, तो नागरिकांशी नातं दृढ करण्याचा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यांच्या या वागणुकीमुळे बारामतीत सहानुभूती आणि सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे.






