इंदापूर मधील कोरोनाचे सत्र सुरूच…
इंदापूरमध्ये एक तर उद्धट येथे कोरोनाचे नवे दोन रुग्ण.
इंदापूर मधील कोरोनाचे सत्र सुरूच…
इंदापूरमध्ये एक तर उद्धट येथे कोरोनाचे नवे दोन रुग्ण.
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
आज दि.७ जुलै रोजी तालुक्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत तीन ने भर पडली असून इंदापूर शहरातील कसबा बाब्रस गल्ली येथील एका ३४ वर्षे व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून उद्धट येथे काल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णाच्या संपर्कातील पाचजणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये या रुग्णाच्या पत्नीसह मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
तर उर्वरीत तिघांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
या सर्व रुग्णांवर इंदापूरच्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.सध्या प्रशासनाकडून परिसर सील करण्यात आला असून संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.