स्वच्छतेत बारामती बसस्थानक राज्यात अव्वल; 1 कोटींच्या पुरस्काराने होणार गौरव
राज्यातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ बसस्थानकाचा मान

स्वच्छतेत बारामती बसस्थानक राज्यात अव्वल; 1 कोटींच्या पुरस्काराने होणार गौरव
राज्यातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ बसस्थानकाचा मान
बारामती वार्तापत्र
बारामतीकरांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 अंतर्गत अ वर्ग बसस्थानकांच्या गटात बारामती बसस्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल बारामती बसस्थानकाला तब्बल 1 कोटी रुपयांचे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्या बसस्थानकांचा पुरस्कार वितरण सोहळा 1 जून 2026 रोजी मुंबई येथे पार पडणार असून, राज्याचे परिवहन मंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
बारामती बसस्थानक हे स्वच्छता, शिस्त, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा आणि व्यवस्थापन यासाठी राज्यभरात ओळखले जाते. या बसस्थानकाच्या उभारणीमागे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दूरदृष्टी आणि स्वच्छतेबाबतचा आग्रह महत्त्वाचा मानला जातो.
त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या बसस्थानकाला राज्यातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ बसस्थानकाचा मान मिळाल्याने बारामतीकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
या यशामुळे बारामतीच्या नावावर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, अनेक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या यशाचे श्रेय बसस्थानक प्रशासन, कर्मचारी आणि बारामतीकरांच्या स्वच्छतेबाबतच्या जागरूकतेला दिले आहे.






