स्थानिक

बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

विविध गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार

बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

विविध गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार

बारामती वार्तापत्र 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बारामती येथे दि. २८ व २९ मे २०२६ या दोन दिवसांत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 चव्या जयंतीनिमित्त आयोजित केले असल्याने 301 रक्तपिशव्यांचे उदिष्ट ठेवण्यात आले होते.

परंतु या शिबिरात महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकूण 321 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

रक्तदान हे श्रेष्ठ समाजसेवेचे कार्य असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिबिराला अभूतपूर्व यश मिळाले.

अधिकारी, कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रज्ञा भालेराव, उपअधिष्ठाता, डॉ. नकाते, प्राध्यापक व विभागप्रमुख, शरीरविकृती शास्त्र विभाग, डॉ. राजेश उमप, वैद्यकीय अधीक्षक , श्री. नंदकुमार कोकरे, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या रक्तदान शिबिरातून संकलित झालेल्या 321 रक्तपिशव्या विविध गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार असून, रक्तदानाचा सामाजिक संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात या उपक्रमाला मोठे यश मिळाले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व रक्तदाते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Back to top button