बारामती तालुक्यातील गुणवडीत अवैध हातभट्टीवर संयुक्त धाड; जमिनीत पुरलेला दारू साठा जप्त
शहर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला.

बारामती तालुक्यातील गुणवडीत अवैध हातभट्टीवर संयुक्त धाड; जमिनीत पुरलेला दारू साठा जप्त
शहर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील गुणवडी येथे आज शहर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत अवैध हातभट्ट्यांवर धाड टाकली. या कारवाईदरम्यान घराच्या आत जमिनीत खड्डा करून लपवून ठेवलेला दारूचा साठा उघडकीस आला. पोलिसांनी हा साठा जप्त केला असून या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुणवडी परिसरात अवैध हातभट्टीद्वारे दारू निर्मिती व विक्री सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.
त्यानुसार शहर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला. तपासणीदरम्यान एका घराच्या परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्याने जमिनीची पाहणी करण्यात आली. यावेळी जमिनीत खड्डा करून लपवून ठेवलेला दारूचा साठा आढळून आला. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात दारू व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले असून या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात प्रशासनाने मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
या धाडीनंतर गुणवडीसह परिसरातील अवैध हातभट्टी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत अशाच प्रकारच्या आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






