गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे बारामतीपर्यंत? चंद्रमणीनगर मध्ये सापडले श्री जातीचे अभ्रक
मांजर तोंडात घेऊन आले होते अशी माहिती आहे.

गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे बारामतीपर्यंत? चंद्रमणीनगर मध्ये सापडले श्री जातीचे अभ्रक
मांजर तोंडात घेऊन आले होते अशी माहिती आहे.
बारामत वार्तापत्र
पुणे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे आता बारामतीपर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमराई परिसरातील चंद्रमणीनगर येथे एक मुलगी जातीचे अभ्रक कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिसून आले आहे. सदर अभ्रक सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात आणले आहे. कायदेशीर कारवाई सुरु आहे.
आमराई परिसर अथवा अन्य लगतच्या हॉस्पिटल मध्ये किंवा घरी गोळ्या घेऊन गर्भपात केला असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा गर्भलिंग निदान रॅकेटशी काही संबंध आहे का, याबाबत तपास यंत्रणा पडताळणी करत आहेत.
घटनेनंतर आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या असून स्थानिक स्तरावर तपास सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपात प्रकरणांवर कारवाईचा वेग वाढला असून, तपासात नवीन धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
—
पाच महिन्याचे अभ्रक कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आले आहे तेथे त्याला मांजर तोंडात घेऊन आले होते अशी माहिती आहे. यामध्ये हॉस्पिटल मध्ये मेडिकल वेस्टची विल्हेवाट व्यवस्थित लावली नसावी असा अंदाज आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमके वास्तव समोर येणार आहे — श्रीशैल्य चिवडशेट्टी पोलीस निरीक्षक बारामती शहर






