दि.माळेगाव कारखान्याचे कांडे बिल २०० रुपये प्रतिटन जाहीर
ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दि.माळेगाव कारखान्याचे कांडे बिल २०० रुपये प्रतिटन जाहीर
ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम सन २०२५-२६ मध्ये तुटून आलेल्या उसाला कांडे बिलापोटी २०० रुपये प्रति टन जाहीर केले आहे. शनिवार (दि.०६) राज्याच्या उपमुख्यमंत्री व माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.यामुळे कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना मोठा दिलासा मिळणार आहे.कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून, हे बिल लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल,अशी माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
माळेगाव साखर कारखाना हा राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या पत्नी व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी हाती घेतली आहे.






