तुकोबांच्या पादुका पूजनाच्या शतकांपूर्वीच्या परंपरेला तडा? बारामतीत मानपानावरून वाद; भाविकांना दर्शनासाठी मनस्ताप
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षे पालखी सोहळ्याचे नियोजन पाहिले.
तुकोबांच्या पादुका पूजनाच्या शतकांपूर्वीच्या परंपरेला तडा?
बारामतीत मानपानावरून वाद; भाविकांना दर्शनासाठी मनस्ताप
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षे पालखी सोहळ्याचे नियोजन पाहिले.
बारामती वार्तापत्र
जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान बारामती येथे होणाऱ्या पादुका पूजनाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार बारामती नगरपरिषदेच्या वतीने तत्कालीन नगराध्यक्ष (सध्या प्रशासकीय व्यवस्था असल्यास नियुक्त प्रतिनिधी) आणि मुख्याधिकारी यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचे पूजन केले जाते.
ही परंपरा अनेक दशकांपासून अखंडपणे पाळली जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, यंदाच्या सोहळ्यात पादुका पूजनावेळी ज्या ठिकाणी मेंढ्यांचे रिंगण असते तेथे त्यांना मानपान मिळत नाही अशा परिसरातील सात जणांनी पूजनस्थळी प्रवेश मिळवून नगरपरिषदेच्या पारंपरिक मानाचा अवमान करत स्वतः मान मिळविल्याचा प्रकार आहे अशी भावना व्यक्त होत आहे. यामुळे बारामतीत धार्मिक परंपरा आणि प्रोटोकॉलच्या पालनाबाबत चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षे पालखी सोहळ्याचे नियोजन पाहिले. मात्र त्यांनी कधीही नगरपरिषदेच्या पारंपरिक मानामध्ये हस्तक्षेप केला नाही किंवा ही परंपरा मोडली नाही, अशी आठवण अनेकांनी यानिमित्ताने व्यक्त केली. त्यामुळे यंदाच्या घडामोडींनंतर “परंपरेला तडा का गेला?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाने केलेले नियोजन, निविदांद्वारे करण्यात आलेली कामे आणि प्रत्यक्ष व्यवस्थापन यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आल्याचीही नागरिकांमध्ये चर्चा आहे. दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागल्याचे सांगितले जात आहे.
बॅरिकेडिंग, प्रवेश-निर्गमन व्यवस्था आणि दर्शन रांगेतील गोंधळामुळे अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली, तर काहींना समाधानकारक दर्शनही घेता आले नाही त्यामुळे पुन्हा दादांची उणीव समोर आली आहे.







