स्थानिक

बारामतीत दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुतळा अनावरण सोहळा ड्रोन व्हिडिओ

बारामतीत दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुतळा अनावरण सोहळा ड्रोन व्हिडिओ

बारामती वार्तापत्र 

बारामती येथे राज्याचे दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनावरणानंतर उपस्थितांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या जनहिताच्या कामांचा, विकासाभिमुख नेतृत्वाचा आणि समाजासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.

वक्त्यांनी आपल्या मनोगतात अजितदादा पवार यांनी बारामतीसह राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे सांगितले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

भावनिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात उपस्थित नागरिकांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_