स्थानिक

छायाचित्र प्रदर्शनातून दादांच्या आठवणींना उजाळा टी.सी. महाविद्यालयात विविध उपक्रम घेत जयंती साजरी

वृक्षारोपण, चित्रकला, निबंध, ब्लॉग लेखन स्पर्धा आणि स्वच्छता अभियानचे आयोजन केले होते.

छायाचित्र प्रदर्शनातून दादांच्या आठवणींना उजाळा टी.सी. महाविद्यालयात विविध उपक्रम घेत जयंती साजरी

वृक्षारोपण, चित्रकला, निबंध, ब्लॉग लेखन स्पर्धा आणि स्वच्छता अभियानचे आयोजन केले होते.

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते स्व.अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फोटोमधून लहानपण, तारुण्य आणि कुटुंबात रमलेले दादा, कामाच्या व्यापात सभा, कार्यक्रमात आणि वारकऱ्यात रमलेले दादा पाहून  आठवणींना उजाळा मिळाला.

अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात डिपार्टमेंट ऑफ मिडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज तर्फे आयोजित प्रदर्शनाचे संस्थेचे सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांनी या सर्व उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ.योगिनी मुळे, डॉ. सचिन गाडेकर, डॉ. अरुण मगर, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, विभागप्रमुख प्रा.राहुल चौधरी आदी मान्यवर उपस्थिती होते.

छायाचित्र प्रदर्शनात दादांच्या जीवनातील महत्वाच्या घटना,  प्रसंगावर आधारित शंभर पेक्षा जास्त छायाचित्र लावण्यात आले होते. त्यामध्ये लहानपणी बहीण- भावंडासह, तरुणपण, विवाह सोहळा, काका शरद पवार, बहीण सुप्रिया पवार, पत्नी सुनेत्राताई पवार, आई , भाऊ, बहिणी,  मुले आदी कुटुंबीयांसमवेत असलेले दादा तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, धार्मिक उपक्रम, राजकीय कारकिर्दीची सुरुवात, विविध निवडणूका,  बारामतीच्या विकासकामांचा आढावा घेत असतानाचे फोटो, तसेच राजकीय सभा, रॅली , भाषणात व्यस्त असलेले दादा त्यांच्या जन्मदिनी नागरिकांना पहायला मिळाले.  प्रदर्शन पाहिल्यानंतर विद्यार्थी, नागरिकांच्या मनात दादांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. प्रदर्शनाला दिवसभर विद्यार्थी, नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत गर्दी केली होती.

टी.सी कॉलेज च्या सांस्कृतिक विभागातर्फे अजित दादांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. यासोबतच क्रीडा विभागातर्फे धावण्याच्या स्पर्धा आयोजित केली होती. ग्रंथालय विभागातर्फे चार तास सलग वाचन उपक्रम घेण्यात आला. तसेच वृक्षारोपण, चित्रकला, निबंध, ब्लॉग लेखन स्पर्धा आणि स्वच्छता अभियानचे आयोजन केले होते.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_