लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेला कोरोनाची बाधा तर भिगवण स्टेशन परिसरातील महिलेची मृत्यू पश्चात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह.
कोरोना रुग्णांची दिवसागणिक भर..
लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेला कोरोनाची बाधा तर भिगवण स्टेशन परिसरातील महिलेची मृत्यू पश्चात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
कोरोना रुग्णांची दिवसागणिक भर..
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
दि.१० जुलै रोजी इंदापुर शहरातील महतीनगर येथील ७२ वर्षीय कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर.
इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन परिसरातील एका ४० वर्षीय महीलेचा रुदयविकाराने मृत्यू झाला आहे. मात्र मृत्यू पश्चात या महीलेची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. याच दरम्यान लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका अंदाजे २७ वर्षीय परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी शनिवार दि.११ जुलै रोजी दिली आहे.
इंदापूर तालुक्यातील भिगवन स्टेशन येथील एका ४० वर्षे महिलेला गेल्या काही दिवसात उलटी,जुलाब,दमा अशा प्रकारचा त्रास होत होता. त्यामुळे उपचारासाठी ती बारामती येथील सिल्व्हर जुबली रूग्णालयात दाखल झाली. तेथील उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना तिच्यावर कोरोनाची लक्षणे जाणवल्याने तिची रुई येथील कोवीड केअर केंद्रात कोरोना तपासणी करण्यात आली. याच दरम्यान तिचा रुदयविकाराने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र चिंतेची बाब ही की मृत्यू पाश्चात्त्य त्या महीलेचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.
तर दुसरीकडे लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका अंदाजे २७ वर्षीय परिचारिकेचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. मागील काही दिवसात या परिचारिकेस शारिरिक त्रास जाणवत होता. यासाठी दि.०९ जुलै रोजी तीला बारामती येथील रुई कोवीड केअर ला उपचारासाठी पाठवले होते. आज दि.११ जुलै रोजी या परिचारिकेचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने प्रचंड चिंता वाढली आहे. कारण या परिचारिकेच्या संपर्कात कार्यालयातील जवळपास ३० ते ४० व्यक्ती आल्याचे समजते. शिवाय या परिचारिकेच्या संपर्कात इतर रुग्ण आलेत का? याचा शोध घेणे प्रशासनापुढे आवाहन असणार आहे. तर या परिचारिकेस लागण नेमकी कशी व कुठे झाली याचाही उलगडा करणे प्रशासनास आव्हान असणार आहे