क्राईम रिपोर्ट

रोहित पवारांच्या PAच्या मुलीच्या बारामतीतील आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; अप्पर SP गणेश बिरादार म्हणाले…

रोहित पवारांच्या PAच्या मुलीच्या बारामतीतील आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा;अप्पर SP गणेश बिरादार म्हणाले…

आईसोबतच्या कौटुंबिक कारणानंतर मुलगी घराबाहेर 16:9 इमेज तयार करून

बारामती वार्तापत्र 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या १४ वर्षीय मुलीचा बारामती शहरातील रुई परिसरात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बारामती शहरासह राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी २२ ऑगस्ट रोजी कौटुंबिक कारणातून घराबाहेर पडली होती. ती घरी परत न आल्याने पालकांनी तिचा शोध घेतला.

त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून परिसरातील उपलब्ध माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोधमोहीम राबवली.
तपासादरम्यान रुई परिसरातील साई गणेश नगर येथील एका इमारतीत मुलीचा मृतदेह आढळून आला.

घटनास्थळाची पाहणी, उपलब्ध तांत्रिक पुरावे आणि इतर तपासाच्या आधारे तिचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणात पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून घटनेच्या सर्व बाबींचा तपास करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Back to top button