बारामतीतील पियाजिओ कंपनीसमोर २१ कंटेनरवर पोलिसांचा दंडुका; ₹२२,५०० दंडाची कारवाई!
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या कंटेनरवर ॲक्शन

बारामतीतील पियाजिओ कंपनीसमोर २१ कंटेनरवर पोलिसांचा दंडुका; ₹२२,५०० दंडाची कारवाई!
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या कंटेनरवर ॲक्शन
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसी परिसरात रस्त्यावर बेशिस्तपणे कंटेनर पार्क करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात बारामती तालुका पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
विमानतळाकडून बारामती शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पियाजिओ कंपनीसमोर रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने उभ्या केलेल्या २१ कंटेनर वाहनांवर एकूण ₹२२,५०० दंड आकारण्यात आला.
एमआयडीसी परिसरातील या मुख्य रस्त्यावर मोठ्या वाहनांची अनधिकृत पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याची दखल घेत बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
दरम्यान, एमआयडीसी परिसरासह बारामती शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने कंटेनर, ट्रक अथवा अन्य वाहने पार्क केल्यास यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करू नयेत, असे आवाहन बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चव्हाण व पोलीस हवालदार वाकळे यांनी केली.






