स्थानिक

“नोटिसा संपल्या, आता लिलावाची वेळ! बारामती आरटीओची ४४ वाहनांवर कारवाई”

“तीन नोटिसा तरीही कर थकीत”

“नोटिसा संपल्या, आता लिलावाची वेळ! बारामती आरटीओची ४४ वाहनांवर कारवाई”

“तीन नोटिसा तरीही कर थकीत”

बारामती वार्तापत्र 

मोटार वाहन कर थकविणे तसेच मोटार वाहन कायदा व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अटकावून ठेवलेल्या ४४ वाहनांवर आता ई-लिलावाची कारवाई होणार आहे. संबंधित वाहनमालकांनी थकीत कर, दंड आणि इतर देय रक्कम भरून वाहनांचा ताबा न घेतल्यास १६ सप्टेंबर २०२६ रोजी या वाहनांचा भंगार (Scrap) स्वरूपात जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे.

वाहनांच्या मूळ मालकांना यापूर्वीच तीन नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही संबंधितांकडून थकीत रकमेचा भरणा करण्यात आलेला नाही तसेच वाहनांचा ताबाही घेण्यात आलेला नाही.

आता फक्त ७ दिवसांची संधी!

आरटीओ प्रशासनाने संबंधित वाहनमालक व ताबेदारांना कार्यालयीन प्रकरणांची पूर्तता करून थकीत कर, दंड व इतर देय रक्कम भरण्याची अंतिम संधी दिली आहे. विहित कालावधीत वाहनांचा ताबा न घेतल्यास कोणतीही पुढील सूचना न देता ई-लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

या ४४ वाहनांची यादी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ई-लिलाव कुठे होणार?

१६ सप्टेंबर रोजी होणारा जाहीर ई-लिलाव MSTC ई-कॉमर्सच्या www.mstcecommerce.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे.

त्यामुळे अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी आणि थकीत रक्कम भरून वाहनांचा ताबा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आता निर्णय वाहनमालकांच्या हातात; नाहीतर १६ सप्टेंबरला ४४ वाहनांचा लिलाव!

Back to top button