बारामतीकरांनो, पाणी जपून वापरा! रविवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा; अनेक भागांत पाणी बंद
नीरा डावा कालव्याच्या प्रवाहाचा परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन.

बारामतीकरांनो, पाणी जपून वापरा! रविवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा; अनेक भागांत पाणी बंद
नीरा डावा कालव्याच्या प्रवाहाचा परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. नीरा डावा कालव्यामधील प्रवाह बंद झाल्याने व उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने बारामती शहर, रुई आणि बारामती ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले आहे. त्यानुसार शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नियमित पाणीपुरवठा केल्यानंतर रविवार, दि. १८ ऑक्टोबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
नगरपरिषदेच्या सूचनेनुसार, रविवारी दि. १८ ऑक्टोबर रोजी शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही. त्यानंतर सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजीही स्वतंत्रपणे नमूद केलेल्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
🔴 रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी या भागांत पाणीपुरवठा बंद
म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूर रोड, एस.टी. स्टँड परिसर, सटवाजीनगर, जवाहरनगर, पोठे रोड, हंबीरबोळ, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड, विजयनगर, साईगणेशनगर, आकांक्षित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड, वसंतनगर, अवधूतनगर, व्हील कॉलनी, तापोवन कॉलनी, विवेकानंदनगर, अवचट इस्टेट, छत्रपती शिवाजी कॉलनी, महादेव मळा, सद्गुरुनगर, पतंगशाहनगर, मेंढरोड, क्षत्रियनगर, श्रावण गल्ली, कोठी गल्ली, तांदुळवाडी बेस चौक, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड महावीर पथ, बुरुड गल्ली, नेवसे रोड, सुभाष चौक, कसबा गल्ली, कचेरी रोड, बजाजीनगर, गावठाण, साईनगर आणि ग्रीन पार्कसह संपूर्ण रुई भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सूचनेत नमूद आहे.
🔴 सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी या भागांत पाणीपुरवठा बंद
संपूर्ण कसबा, फलटण रोड, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड, हनुमान नगर, माळेगाव कॉलनी, सातव वस्ती, शिवाजी नगर, जमादार रोड, कारभारी नगर, सातवमळानगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशील नगर, सातेनगर, जगताप मळा, जुना मोरगाव रोड, खंडोबानगर आणि नवीन मोरगाव रोड परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
💧 नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
नीरा डावा कालव्यामधील प्रवाह सुरू होईपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन दिवसाआड पद्धतीने सुरू राहणार असल्याचे सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा, पाण्याचा वापर जपून करावा आणि आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून ठेवावा.
पाणीपुरवठ्यातील या बदलामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता असली, तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.






