स्थानिक

बारामतीत आजोबांच्या पाया पडले जय पवार! शरद पवारांनीही पाठीवर थाप देत दिले आशीर्वाद

विद्या प्रतिष्ठानच्या ५४ व्या वर्धापन दिनी पवार कुटुंबातील जिव्हाळ्याचा क्षण चर्चेत!

बारामतीत आजोबांच्या पाया पडले जय पवार!
शरद पवारांनीही पाठीवर थाप देत दिले आशीर्वाद

विद्या प्रतिष्ठानच्या ५४ व्या वर्धापन दिनी पवार कुटुंबातील जिव्हाळ्याचा क्षण चर्चेत!

बारामती वार्तापत्र 

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार कुटुंबातील एक जिव्हाळ्याचा क्षण पाहायला मिळाला. ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती एमआयडीसी परिसरात दाखल होताच युवा नेते जय पवार यांनी पुढे येत त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. यावेळी शरद पवार यांनीही जय पवार यांच्या पाठीवर थाप मारत त्यांना आशीर्वाद दिले. या भेटीतील आपुलकीच्या क्षणाची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर) विद्या प्रतिष्ठानच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रेवती सुळे आणि जय पवार विद्या प्रतिष्ठानचे नवे विश्वस्त

विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी रेवती सुळे आणि जय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे दोघेही आगामी काळात संस्थेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या विद्या प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीत त्यांची भूमिका कशी असेल, याकडे लक्ष लागले आहे.

प्रेरणास्थळाची शरद पवारांकडून पाहणी

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असलेल्या प्रेरणास्थळाची पाहणी केली. विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम, नव्या विश्वस्तांची नियुक्ती आणि जय पवार यांनी आजोबा शरद पवार यांचे घेतलेले आशीर्वाद, या घडामोडींमुळे बारामतीतील हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला.

दरम्यान, जय पवार आणि शरद पवार यांच्यातील या भेटीतून कुटुंबातील जिव्हाळ्याचा क्षण समोर आला. मात्र, या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्यापेक्षा प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवरच त्याकडे पाहणे महत्त्वाचे आहे.

 

Back to top button