६२ जणांची चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आव्हान प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे.
बारामती: बारामती शहरातील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील ७० जणांची तपासणी करण्यात आली होती.
यातील ६२ जणांची चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
दरम्यान, आज दिवसभरात शहरात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले असून आता तिघांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.बारामतीत काल जवळपास १८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णांच्या संपर्कातील तब्बल ७० जणांची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. त्यामध्ये आज दिवसभरात पाचजणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६२ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अद्याप तिघांचे अहवाल येणे बाकी आहे.
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांच्या ठिकाणाचे परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. याठिकाणी आरोग्याचा सर्वे केला जाणार आहे. या सर्वे दरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे. प्रतिबंधित क्षेत्रात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आव्हान प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे.