बारामती MIDC मधील वीज समस्यांवर मोठी बैठक! उद्योजकांच्या मागण्यांवर महावितरणचे आश्वासन
मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांची ग्वाही; उद्योजकांच्या समस्यांवर उपाययोजनांचे आश्वासन

बारामती MIDC मधील वीज समस्यांवर मोठी बैठक! उद्योजकांच्या मागण्यांवर महावितरणचे आश्वासन
मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांची ग्वाही; उद्योजकांच्या समस्यांवर उपाययोजनांचे आश्वासन
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसीतील वारंवार होणारे वीज ट्रिपिंग, नवीन वीजजोडणी, ट्रान्सफॉर्मरची देखभाल आणि आगामी औद्योगिक विस्तारासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबत महावितरणकडून उपाययोजना करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या (BIDA) बैठकीत ते बोलत होते. अध्यक्ष धनंजय जामदार यांनी वीजपुरवठा सुरळीत करणे, शटडाऊनची पूर्वसूचना देणे, पॉवर फॅक्टरबाबत मार्गदर्शन करणे, पणदरे एमआयडीसीतील लघुउद्योगांच्या समस्या सोडविणे आणि फेज-२ मधील नवीन प्रकल्पांसाठी वीज सुविधांचे नियोजन करण्याच्या मागण्या मांडल्या.
या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन पेठकर यांनी दिले. बैठकीला महावितरणचे अधिकारी, BIDA चे पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते.
उद्योगांना अखंड वीजपुरवठा मिळाल्यास बारामतीच्या औद्योगिक विकासाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.






