इंदापूरकरांची काळजी घेणारा राज्यमंत्री.
इंदापूरच्या भाजी मंडईत गर्दी न करण्याची भरणेंनी केली हात जोडून विनंती.
इंदापूरकरांची काळजी घेणारा राज्यमंत्री.
इंदापूरच्या भाजी मंडईत गर्दी न करण्याची भरणेंनी केली हात जोडून विनंती.
तात्काळ भाजीविक्रेत्यांना व नागरिकांना दिले मोफत मास्क.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर तालुक्यात माघील दोन दिवसात तब्बल वीस रुग्ण आढळून आले आहेत व दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत,त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आज दि.१७ जुलै रोजी सकाळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना इंदापूर येथील भाजी मंडई ठिकाणी काही नागरिक विना मास्क फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी आपली गाडी त्याच ठिकाणी थांबवून लोकांना गर्दी करू नका,मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा व आपली काळजी घ्या असे सांगून तेथील फळ विक्रेत्यांना भाजी विक्रेत्यांना व नागरिकांना शेकडो मास्क चे वाटप केले.
या अगोदरही लॉकडाउनच्या काळात इंदापूर चे आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची पालकमंत्री पदी निवड झाल्या नंतर दुसऱ्याच दिवशी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावावर सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी जात असताना इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावांमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँके समोर अचानक गर्दी दिसल्याने लगेच भरणे यांनी कसलाही विचार न करता गाडीतून खाली उतरुन नागरिकांची झालेली गर्दी पागवंत सुरक्षित अंतर ठेवण्याची विनंती केली होती व कोरोना संदर्भात बँक मधील कर्मचाऱ्यांची कान उघडणी करत गर्दी न होऊ देता काम जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
राज्यमंत्री भरणे यांची नेहमीच सर्वसामान्य लोकांशी असलेल्या अशा आपुलकीच्या संबंधामुळे ते सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.