कु. श्रद्धा कवडे-देशमुख क्रॉप सायन्स विषयात राज्यात प्रथम.
श्रद्धाने बावडा केंद्रासह विद्यालयात ही मिळवला प्रथम क्रमांक
कु. श्रद्धा कवडे-देशमुख क्रॉप सायन्स विषयात राज्यात प्रथम.
श्रद्धाने बावडा केंद्रासह विद्यालयात ही मिळवला प्रथम क्रमांक.
सिद्धार्थ मखरे (इंदापूर तालुका प्रतिनिधी )
लाखेवाडी (१७ जुलै) : १६ जुलै रोजी झालेल्या बारावीच्या निकालामध्ये लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड कॉलेजमध्ये इयत्ता बारावी विज्ञान विभागात शिकणाऱ्या कु. श्रद्धा राजेंद्र कवडे-देशमुख या विद्यार्थिनीने क्रॉप सायन्स या विषयात २०० पैकी २०० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच श्रद्धाने बावडा केंद्रासह विद्यानिकेतन स्कूल अँड कॉलेज मध्ये ९०.६१ टक्के गुणांसहित प्रथम क्रमांक पटकावला आहे.
श्रद्धाने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर संपूर्ण तालुक्यातुन कौतुकाचा वर्षाव होत असून, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तोंडभरून कौतुक केले आहे, तर संस्थेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदिप गुरव यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे प्रशासक गणेश पवार यांनी सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपुल वाघमोडे यांनी केले.
“श्रध्दा कवडे-देशमुख हीचे वडील राजेंद्र कवडे देशमुख उत्कृष्ट पत्रकार असून त्यांचे शिक्षण बी.एस.सी.अँग्री झाले आहे. घरातूनच उत्तम संस्कार आणि वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन तिला मिळाले व त्या संधीचे श्रध्दाने आज सोने केले. आपल्या मुलीने घवघवीत यश संपादन केल्याचे पाहून वडिलांचे आनंदाश्रू अनावर झाले.”