शैक्षणिक

आय कॉलेज’चे सर्व प्रवेश ऑनलाईन होणार – हर्षवर्धन पाटील.

महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अँडमिशन घेण्याचे केले आवाहन.

आय कॉलेज’चे सर्व प्रवेश ऑनलाईन होणार – हर्षवर्धन पाटील.

महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अँडमिशन घेण्याचे केले आवाहन.

इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )

इंदापूर येथील आय कॉलेजचे संपुर्ण प्रवेश गेल्या दहा वर्षापासून ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येणे शक्य नाही म्हणूनच आय कॉलेजने ऑनलाईन पेमेंटचीही सुविधा या वर्षापासून उपलब्ध करुन दिली आहे.

महाविद्यालयाच्या www.ascicollege.org या संकेतस्थळावरुन ऑनलाईन ॲडमिशन विद्यार्थ्यांनी घ्यावेत असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन अध्ययन अध्यापन पध्दतीचा अवलंब केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
संस्थेच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी या योजनेचे कौतुक केले.संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी शिक्षकांनी या योजनेत सहभाग घेतल्याने त्यांचे कौतुक केले व महाविद्यालयाचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आय कॉलेज मॉडेल कॉलेज म्हणून निवड केल्यामुळे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचे आभार व्यक्त केले. तसेच एल.एम.एस. नुडल प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.तसेच सर्व प्राध्यापकांना सध्या एल.एम.एस. नुडल शिकविण्याचे प्रशिक्षण विद्यापीठामार्फत दिले जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. प्रवेश घेण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात येण्याची आवश्यकता नाही त्यांनी आय कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन त्यांनी त्वरित आपला प्रवेश घ्यावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!