इंदापुरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन.
अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन.
इंदापुरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन.
अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५१ व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते इंदापुर येथील श्रीराम चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे व साठेनगर मधील प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त विद्रोही साहित्य संमेलन अंतर्गत सोशल डिस्टेंसिंग ठेवून सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे गारटकर यांनी आवाहन केले.
या वेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत, प्रा .अशोक मखरे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, सतिश सागर, ललेंद्र शिंदे, मयुर ढावरे, ऊमेश ढावरे, बापू आडसुळ, सचिन गायकवाड,बाळू आडसुळ, चंद्रकांत सोनवणे, विनायक लोंडे, राजु गुळीक,शिवाजी शिंदे सर ,राजु शिंदे,संजय खंडाळे, नंदू खंडाळे, बापू थोरात,दादा ढावरे उपस्थित होते.